नगर परिषद वार्ड नंबर १ हद्दीतील श्रीनाथ नगर येथील रहिवास्यांचे आरोग्य धोक्यात --प्रशासन जबाबदार ? __________________________________________. __(संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम) __________________________________________मंगरूळपीर--मंगरूळपीर न.प. वार्ड नंबर १ हद्दीतील श्रीनाथ नगर प्लाॅट नंबर १,जिनिंग प्रसिंग रोड च्या उजव्या बाजूला संजय भिकाजी चौधरी व साहेबराव फुके यांच्या घराजवळ च्या खाली प्लाॅट मध्ये पाऊसाचे पाणी व नालीतील पाणी साचले असून हे नाली वाहती असून बाराही महिने पाणी साचलेले असते आणि पाऊस जास्त झाल्यामुळे याला तलावाचे स्वरूप झालेले आहे ही खरी वस्तुस्थिती आहे आणि यामुळे रोगराई व डांसाचा उपद्रव होत आहे यामुळे डेंग्यू ताप साथ पसरलीय आहे रहिवासी चे आरोग्यविषयक समस्या वाढत आहे.तसेच नालीचे बांधकाम अपूर्ण असून नाली अरूंद पाणी असून पाणी वाहत जात नाही तसेच जागोजागी लोकांनी नाली बंद केलेली आहे त्यामुळे सुध्दा काॅलनीमध्ये घाण साचली आहे.याला जबाबदार कोण आमचे आरोग्य बिघडत चालले आले आहे आणि जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार राहील का ? याला जबाबदार कोण तसेच आणि अनेक घरांच्या भिंती ओल्या झालेल्या आहेत त्यामुळे नुकसान होत आहे. काॅलनीमधील सर्व नागरिक वारंवार न.प.मुख्याधिकारी साहेब व वार्ड मेंबर नगरसेवक, नगराध्यक्ष यांना निवेदन व भेट घेऊन समस्या मांडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तरी नगर परिषदेने सदर पाण्याचा योग्य निर्णय व नियोजन करून नाली तयार करून साचलेले पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा.अशी नागरिकांनी मा.जिल्हाधिकारी वाशिम,मा.उपविभागीय अधिकारी महसूल मंगरुळपीर, मुख्याध्यिकारी मंगरुळपीर,मा.आमदार श्री श्यामभाऊ खोडे मं.पीर वाशिम मतदारसंघ,मा.जि.प.अध्यक्ष वाशिम यांना निवेदना द्वारे आमची समस्या सोडवण्यासाठी मागणी केलेली आहे तरी यावेळी वार्ड नंबर १ मधील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
byमीडीया पोलीस टाईम
-
0