शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मागण्यांना लोकप्रतिनिधी व नागरिकांचा एकत्रित पाठिंबा यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन.. (यावल तालुका प्रतिनिधी( रविंद्र आढाळे). यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या प्रमाणातील पिक नुकसानीबाबत शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, या मागणीसाठी स्थानिक नेते, शेतकरी प्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितरित्या निवेदन देत पाठिंबा दर्शविला आहे.स्थानिक स्तरावर प्रभावी मानले जाणारे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारींचा समावेश आहे. या प्रसंगी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष मुकेश येवले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुका अध्यक्ष शरद कोळी, काँग्रेसचे माजी आमदार रमेश दादा चौधरी, राष्ट्रवादीचे अतुल पाटील, गोपाळ चौधरी, कडू पाटील, गिरीष देशमुख, पुंजाजी बोदडे, निवृत्ती पाटील, अरुण लोखंडे, यशवंत जासूद, अमोल भिरूड, अनिल जंजाळे, रमेश महाजन, दिनकर फेगडे, मिलिंद नेहते, भागवत पाचपोळे, विनोद भागवत पाटील, किशोर तायडे, विनोद कोळी, सुनील जोशी, पुंडलिक रायसिंग, मिलिंद कोळी, पाटील सर, जगदीश कवडीवाले, अकिलोद्दीन नासिरोद्दीन, योगेश भंगाळे, राकेश भंगाळे, पंकज पाटील, रुबाब तडवी, कमाल तडवी, रामचंद्र सावळे, जगदीश पाटील, प्रमोद नेमाडे, संतोष खर्चे, प्रवीण लोणारी, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, संदीप भालेराव, साकळी विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष महाजन, धीरज पाटील, आसिफ पाटील, समीर खान, ललित पाटील, रफिक शेख, फरहान शेख आदींसह महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांना व्यापक लोकसमर्थन लाभले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. शासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी सर्वांची मागणी आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0