शहादा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात ‘केमिस्ट्री क्लब’चे उद्घाटन संपन्न. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार विशेष जिल्हा प्रतिनिधी ) शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी केमिस्ट्री क्लब (केमिकल सोसायटी) ची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबचे उद्घाटन सनराईज इंडस्ट्रीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल होते.या क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्राविषयीची आवड निर्माण करणे, प्रायोगिक कौशल्ये विकसित करणे आणि उद्योग-शैक्षणिक दुवा मजबूत करणे हा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक भेटी, इंटर्नशिप, तांत्रिक कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमांची संधी मिळेल. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन, पोस्टर स्पर्धा, केमिस्ट्री टॅलेंट सर्च परीक्षा यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे. सोबतच उदयोन्मुख संशोधन आणि नवोन्मेषी प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लावणे आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यात संवाद वाढवून व्यावहारिक ज्ञान, उद्योगातील गरजा व करिअर संधी याबद्दल मार्गदर्शन करणे.या प्रसंगी प्रमुख पाहुणे सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास आणि उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्योगातील अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करताना मेहनत, सातत्य आणि नाविन्यपूर्ण विचार यांमुळे यश मिळवता येते यावर भर दिला.रसायनशास्त्र विभाग व सनराईज इंडस्ट्रीज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून दरवर्षी विद्यार्थ्यांना औद्योगिक इंटर्नशिप व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. के. पटेल यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद एम. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभारप्रदर्शन डॉ. ए. जी. बेलदार यांनी केले.कार्यक्रमाला पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0