*समाज व राष्ट्रहितासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सज्ज रहावे - प्राचार्य अनिल पाटील. *रावेर (प्रतिनिधी सानिया तडवी ) – २४ सप्टेंबर रोजी रावेर येथील श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कसा असावा तसेच त्याने समाज हिताची कार्य करावी आणि स्वतःला राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर ठेवावे असे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सी. पी. गाढे सर यांनी माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.प्रा.गाढे सरांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून एनएसएसची स्थापना, पार्श्वभूमी, ध्येय-धोरणे, ब्रीदवाक्य "माझ्या साठी नाही तुमच्या साठी " याचे सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांना एनएसएस चिन्हांची माहिती दिली, ज्यामध्ये समाजसेवा, एकता, आणि स्वयंशिस्त यांचा संदेश दडलेला आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि स्वयंसेवा यांचा विकास कसा होतो याचे महत्व त्यांनी उलगडून दाखवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. राजकुंदल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तेजस दसनूरकर यांनी मानले.कार्यक्रमास आय क्यू ए सी समन्वयक प्रा. बी. जी. मुख्यदल, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एन. बी. जाधव, उपधिकारी प्रा. एल. एम. वळवी यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा विकसित व्हाव्यात आणि "स्वयंसेवेचा" खरा अर्थ समजावा, असा हेतू यामागे होता. राष्ट्रीय सेवा योजना च्या उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक योगदानातही पुढाकार घेतात ही बाब प्राचार्य अनिल पाटील यांनी येथे अधोरेखित करून दिली. दिला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0