गोगरी ग्रामपंचायत येथे महाराजस्व सेवा पंधरवडा ग्रामसभा संपन्न ______________________________. (संजय भरदुक (विशेष प्रतिनिधी वाशिम जिल्हा) _______________________________मंगरूळपीर--१७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०२५ या पंधरवडा अभियानांतर्गत गोगरी गावात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शुभारंभ कार्यक्रम टीव्हीवर दाखवण्यात आला.मुख्ममंत्री समॄध्द पंचायतराज अभियानांतर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने गावातील ग्रामस्थांनी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावाच्या प्रगतीसाठी, शिक्षण, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ता, गावातील सिंमेंट रस्ते, पांदण रस्ते, आरोग्य सुविधा, ग्रामविकास निधी योग्य प्रकारे नियोजन करून वापर, सिंचन सुविधा, महिला उद्योग, स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन , प्रशिक्षण, तसेच गावातील महसूल नकाशा सरकारी पाणंद रस्ते वहिवाट पांदण रस्ते, शेतकरी येजा रस्ते यांना नंबर देणे अशा अनेक समस्यांना सामोरे ठेवून गावाच्या विकासासाठी समस्येचे निराकरण ग्रामसभेत घेतली.ग्रामसभेला ग्रामसेवक(ग्रामपंचायत अधिकारी),सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी,जिप मुख्याध्यापक सह, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, व महिला मंडळ प्रामुख्याने उपस्थित हजर होते

गोगरी ग्रामपंचायत येथे महाराजस्व सेवा पंधरवडा ग्रामसभा संपन्न ______________________________
Previous Post Next Post