लासूर भागात मुसळधार पावसामुळे कांदा पिक पाण्यात.. शेतकरी राजा हवालदिल.. सप्टेंबर २८, २०२५लासूर भागात मुसळधार पावसामुळे कांदा पिक पाण्यात.. शेतकरी राजा हवालदिल.. (चोपडा दि.२८( संजीव शिरसाठ) :- लासूर येथे आज सकाळ पासून मुसळधार पावसामुळे कांदा लागवड केलेल्या शेतामध्ये पाणी साचल्याने कांदा पिकं हे अक्षरश: पाण्यात बुडाले आहे. यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांच्या तोंडातून हिरावून घेत आहे. यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगर डोक्यावर ठेवला जाईल. या मुसळधार पावसामुळे मक्का, कापूस, सोयाबीन आदि पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी जिवन जगायचं कसे? असा प्रश्न उपस्थित या निमित्ताने उभा राहत आहे. शेतमालाला हवा तसा भाव मिळत नाही. वरून निसर्गाची अवकृपा.... शेतकर्यांनी मदत मागावी कुणाकडे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकर्यांना जगाचा पोशिंदा संबोधले जाते परंतु त्याच जगाचा पोशिंदावर उपासमारीची वेळ आली त्याचे काय? अगोदरच शेतीसाठी लागणारे बि-़बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते यांची भाव गगनाला भिडले आहे. आणि शेतकर्यांना वर एकामागून एक संकटं येत असल्यामुळे शेतकरी पुन्हा कसा उभा राहिल. हा हि प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0