वाशिम येथे गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न ____________________________________________आज दिनांक २८/०९/२०२५ ला रविवार मराठा समाज सेवा मंडळ वाशिम च्या वतीने सकाळी ११ वा.गुणवतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तरी या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर वरील सर्व मान्यवरांचे शाल व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. नारायणराव गायकवाड, आणि प्रास्ताविक श्री प्रा.रघुनाथ उखळे सर यांनी केले.आणि श्री पांडुरंगजी ठाकरे व माधवरावजी अंभोरे साहेब व अध्यक्षीय प्रा.भाऊसाहेब काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री प्रा.भाऊसाहेब काळे,मा.अमीत झनक,मा.महादेवराव काकडे,मा.माधवरावजी अंभोरे,मा.पाडूरंगजी ठाकरे,मा.नारायणराव गोटे,मा.चक्रधरजी गोटे,मा.सुरेशभाऊ मापारी,मा.सहदेवराव शिंदे, मा.नारायणराव बारड, मा.पाडर मा.नारायणराव काळबांडे,मा.राजेंद्र दहातोंडे, श्री तानाजी कव्हर, श्री.डाॅ.दिपक शेळके, श्री दिनकरराव वाटाणे, श्री.राम विजयराव जाधव, इंजि.श्री.बळीराम इढोळे, श्री साहेबराव मापारी,इंजि.श्री.श्रीराम नानोटे, श्री तुळशीरामजी आरू सर, ऍड.श्री सुरेश टेकाळे, श्री.पंढरी आरू साहेब, डॉ.सौ.प्रिती पाटील, श्री शंकरराव उजळे,सौ.वॄषाली सुरेश टेकाळे, श्री बालाजी मुळे, श्री ज्ञानेश्वर वाघ, श्री.सौ.ज्योती रमेश खोडे,इंजि.अशोकराव बुंधे, श्री वीरेंद्र वाटाणे,ॲड.बलवंत जाधव, श्री विनोद जाधव, श्री भुजंगराव भारप्टे यांच्या उपस्थितीतील प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते २२५ व्यक्तींचा गुणवंतांचा गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .आणि या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सत्कारमूर्ती व हजांरोच्या संख्येने प्रतिष्ठीत नागरिक व महिलांची उपस्थिती होती आणि शेवटी प्रा.तुकारामजी शेवाळे सर यांनी मराठा समाज सेवा मंडळ व आयोजकांच्या च्या वतीने उपस्थित मान्यवर मंडळी व सत्कारमूर्ती गुणवंतांचे , जेष्ठ नागरिक मार्गदर्शक, महिला मंडळी , जेष्ठ महिला मंडळी, सर्वांचे आभार मानले.शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

वाशिम येथे गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न..
Previous Post Next Post