स्वामीत्व योजना महाराजस्व अभियानांतर्गत जांब येथे सनद वाटप ________________&_&__________________________मंगरूळपीर-- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत डोॢन सर्व्हेक्षण झाले होते.त्या पूर्ण झालेल्या गावातील नागरिकांना आता मिळकतीच्या मालकी हक्क सनद वाटपाचा कार्यक्रम आज दिनांक ३०/०९/२०२५ सदर ग्रामपंचायत मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तरी २८ सप्टेंबर ते २ आक्टोंबर पंधरवडा निमित्ताने गावठाणातील जागाचे अधिकॄत दस्तऐवज प्राॅप्रटी कार्ड (सनद) वाटपाचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी श्री राजेन्द्र जाधव साहेब यांच्या हस्ते श्री तुकाराम अव्हाळे, श्री रमेश अव्हाळे, श्री रामराव भरदुक, श्री रविंद्र काळे, नामदेव अंभोरे, इतर गावकऱ्यांना वितरण करण्यात आले.मंडळ अधिकारी मनवर साहेब,श्री खुळे साहेब तलाठी, तलाठी श्री किशोर भावके, श्री सुदर्शन खिल्लारे,श्री उल्हास पांडे,,सरपंच सौ.सुनिता खिराडे,ग्राम सदस्या सौ.सिमा अव्हाळे, कोतवाल सौ.भिडीकर मॅडम,पोलीस पाटील श्री मधुकर अव्हाळे, अंगणवाडी सेविका सौ.किरण सावळे यांची उपस्थिती होती.तसेच गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.
byमीडीया पोलीस टाईम
-
0