महिला सक्षमीकरण हीच खरी सामाजिक उन्नती …!!!______________________________________________________ मालेगाव --आज नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गतलोकसंचलित साधन केंद्र, मालेगाव - १ तर्फे आयोजित १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथे उपस्थित राहून महिलांच्या प्रगतीसाठी होत असलेल्या कार्याची माहिती घेण्याची संधी मिळाली.महिला आर्थिक विकास महामंडळ व स्वयं-सहायता गट यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर होत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर महिला सक्षम झाल्यासच खरी प्रगती शक्य आहे.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवणाऱ्या सर्व महिला भगिनींना व आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!

महिला सक्षमीकरण हीच खरी सामाजिक उन्नती …!!!______________________________________________________
Previous Post Next Post