श्री भवानी माता (जगदंबा देवी) तिर्थक्षेत्र नवरात्र उत्सवात पारवा येथे निःशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन ___________________________________मंगरूळपीर--तालुक्यातील पारवा येथे श्री भवानी माता जगदंबा देवी तिर्थक्षेत्री नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. धार्मिक कार्यक्रम भागवत सप्ताह साजरा केला जातो आणि दररोज नवरात्रात हजारोच्या संख्येने भाविक भक्त दर्शन व प्रसादाचा लाभ घेतात, आणि दिनांक २७/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ पर्यंत डॉक्टरांची टीम आरोग्य तपासणी केल्या जाते ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर व तालुका आरोग्य केंद्र व प्राथमीक आरोग्य केंद्र मोहरी च्या वतीने निःशुल्क आरोग्य तपासणी केल्या जाते.आणि तसेच खाजगी डॉक्टर डॉ.स्विटी दहातोंडे, डॉ.रूचा बोरूडकर, डॉ.प्रशांत जानोरकर व डॉ.श्रॄती प्र.जानोरकर यांची सुध्दा निःशुल्क आरोग्य शिबीरामध्ये आरोग्य तपासणी केल्या जातात . जगदंबा माता विश्वस्त मंडळ पारवा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नवरात्र उत्सवात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येतात समस्त भाविक भक्त व गावकरी मंडळी तनमनधनाने नवरात्र उत्सवात सहभागी होतात.
byमीडीया पोलीस टाईम
-
0