अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी जेलभरो आंदोलन अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि अन्य मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १९) राज्यभर जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून धर्माबाद शहरातही आंदोलन करण्यात आले.धर्माबाद येथील आंदोलनाचे नेतृत्व लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही. जी. डोईवाड यांनी केले. तहसील कार्यालय ते पोलिस स्टेशन दरम्यान रॅली काढून, ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत हलगी मोर्चा काढण्यात आला. शेकडो समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. लोकस्वराज्य आंदोलन मागील तीन ते साडेतीन दशकांपासून अनुसूचित जाती आरक्षणाचे 'अबकड' पद्धतीनेधर्माबाद : लोकस्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.उपवर्गीकरण व्हावे, यासाठी विविध स्वरूपाची आंदोलने, मेळावे, मोर्चे, पदयात्रा आयोजित करत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचे तत्काळ उपवर्गीकरण करावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशींची अंमलबजावणी करावी, न्यायमूर्ती बदर समितीचा कालावधी सहा महिन्यांऐवजी एक महिना करावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात बी.एम. गोणारकर, एम.जे. पिंगळे,नागोराव कमलाकर, लक्ष्मण निदानकर जी.आर. गोणारकर, नारायण इबितवार पत्रकार सुरेश घाळे, सत्यनारायण पवळे, संजय गायकवाड, श्याम पिंगळे अविनाश पिंगळे आदींसह अनेक समाजबांधव सहभागी झाले होते.आंदोलन शांततेत पार पडले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर आणि उपनिरीक्षक माधव लोणेकर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी जेलभरो आंदोलन 
Previous Post Next Post