भोई समाज आरक्षणाचे शिल्पकार स्व. जतिरामजी बर्वे यांना देवळीत अभिवादन; ‘भोई गौरव’ मासिकाचे प्रकाशन...*. ( देवळी तालुका प्रतिनिधी:-(रविंद्र पारीसे) भोई समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, थोर समाजसुधारक व माजी खासदार मत्स्यमहर्षी स्व. जतिरामजी बर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवळी येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भोई समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी स्व. जतिरामजी बर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मत्स्यमहर्षी जतिरामजी बर्वे हे भोई समाजाचे मार्गदर्शक, दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी व समाजहितासाठी झटणारे नेतृत्व होते. भोई समाजाला आरक्षण मिळावे, समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी समाजाच्या शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायासाठी ठोस भूमिका घेतली. त्यांच्या कार्यामुळे भोई समाजाला नवी दिशा व बळ मिळाले. त्यांचे विचार, त्याग व समाजाप्रती असलेली निष्ठा आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाज उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. मत्स्यमहर्षी जतिरामजी बर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून करण्यात आली. यानंतर दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या स्व. जतिरामजी बर्वे स्मृती विशेषांक ‘भोई गौरव’ मासिकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या मासिकातून समाजातील विविध घडामोडी, सामाजिक कार्य, युवकांचे योगदान व समाजप्रबोधनाचे विचार मांडण्यात येतात. या कार्यक्रमास महर्षी वाल्मिकी भोई समाज संस्था अध्यक्ष रविंद्र भानारकर, युवा उद्योजक व पत्रकार रविंद्र पारीसे, जगदीश मांढरे, रामकृष्ण पारीसे, रमेश डोंगरे, घनश्याम मांढरे, वसंत भानारकर, राहुल कामडी यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0