*मा.आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांनी अखेर गुर्जर समाजाचे सभागृह आलेच.....* चोपडा ( संजीव शिरसाठ ) तालुक्याची विकासाची चर्चा सर्वश्रुत आहे.चोपडा तालुक्यात कधीही न पाहिलेला विकास तालुक्यातील नागरिकांना याची देही अनुभवायला मिळाला आणि याची डोळा बघायला मिळत आहे.याचे श्रेय जाते ते तालुक्याचे "विकासाचे जनक" आ.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांना.म्हणून आपणहून जनतेने त्यांना जनतेने कार्यसम्राट ही उपाधी बहाल केली.मध्यंतरी चोपडा तालुक्याचे नेतृत्व सर्वांत यशस्वी पहिली महिला माजी आमदार लताताईजी सोनवणे यांच्याकडे आले.त्यांनीही प्रा.आ.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या विकासाचे लक्ष पुढे नेत तालुक्याचा विकासाला गती दिली. आणि विकासात सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे कार्य केले. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे चोपडा शहरातील नारायणवाड़ी येथील गुर्जर समाज बांधवांसाठी मा.आ.लताताईजी सोनवणे यांच्या प्रयत्नांनी बांधले गेलेले भव्य असे समाजाचे सभागृह आहे. गुर्जर समाज तालुक्यात वर्षानुवर्षे सामाजिक आणि राजकीय योगदान देत आला आहे.तरी वर्षानुवर्ष या समाजाकडे अनेक नेत्यांकडून दुर्लक्ष होत आले .तालुक्यात या समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर करण्यात आला.पण एकाही पुढाऱ्याने या समाजासाठी भरीव असे कार्य केले नाही.पण या समाजासाठी दूरदृष्टीकोन ठेवून माजी कार्यशील आ.लताताईजी सोनवणे यांच्या प्रयत्नांनी व आ.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने चोपडा याठिकाणी गुर्जर समाजाचे भव्य सभागृह बांधले गेले. भविष्यात त्या सभागृहामुळे समाजाचे गोर-गरीब समाजबांधवांचे लहान-मोठे कार्यक्रम पार पडून मोठा दिलासा मिळू शकतो.त्यामुळे गुर्जर समाज बांधवांकडून मा.आ.लताताईजी सोनवणे व आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्याविषयी जागो-जागी आभार व्यक्त होताना दिसत आहे . आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताबाई सोनवणे यांचे अभिनंद नरेंद्र पाटील सभापती कृ . ऊ . बा . समिती चोपडा , एम व्ही . पाटिल मा . उपसभापती पं . स . चोपडा ' विकास पाटिल मा . उपनगर अध्यक्ष न . पा . चोपडा ' भुषण पाटिल सरपंच वरगव्हाण ' नानाभाऊ पाटिल उपसरपंच लोणी ' गोपाल पाटिल ' तुषार पाटील 'लिलाधर पाटील अखिल भारतीय युवा गुर्जर समाज विभागीय कार्याध्यक्ष , यांचे सह चोपडा तालुक्यातिल डोळे गुर्जर समाज अभिनंदन करीत आहे .
byMEDIA POLICE TIME
-
0