डॉ. विनोद विनायक देशमुख यांचा वाढदिवस श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक केंद्रात हर्ष उत्साहाने साजरा. (प्रतिनिधी. वर्धा ग्रामीण विपुल पाटील.* ). डॉ. विनोद विनायक देशमुख, आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, यांचा वाढदिवस आज श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र, बोरगाव धांदे येथे मित्रमंडळी, पत्रकार संघ आणि उपस्थित नर्स नंदिनी मॅम यांच्या बरोबरीने हर्ष उत्साहने साजरा करण्यात आला. यावेळी रामकृष्ण सावंत, किसनराव उईके, अशोकराव चाफले, प्रमोद धवड, श्री. प्रमोद हांडे (वर्धा) तसेच इतर गावातील नागरिकही उपस्थित होते. आयुष भारत असोसिएशनचे वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. विपुल पाटील, श्री डॉक्टर किशोर बमनोटे आयुष भारत असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष. माननीय अमोलजी भांगे समाजसेवक. पत्रकार अमोलजी येसणकर, अनिल जी कराळे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष रंगत देणारी ठरली. डॉ. देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले गेले, तर छोटासा केक कापून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्यात एकता, प्रेम आणि सहकार्याचा संदेश प्रकट झाला. सोबतच एक छोटासा आयुर्वेदिक कॅम्पही आयोजित करण्यात आला.डॉ. विनोद देशमुख हे आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असून, आयुर्वेदिक उपचार क्षेत्रात त्यांचा अमूल्य अनुभव आणि मोठं योगदान आहे. ते श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे कार्यरत असून, लोकांच्या आरोग्याची उत्कृष्ट काळजी घेतात.अशी सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्यक्रम नातं अधिक मजबूत करतात आणि समजुतीला चालना देतात.
byMEDIA POLICE TIME
-
0