*ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट* *हवामान बदल आणि ओला दुष्काळ: शेतकरी विसरलेले पुन्हा संघर्षाच्या पल्याड* (रिपाई जेष्ठ नेते नरेश भाऊ ओंकार. ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत ची मागणी). (वर्धा ग्रामीण प्रतिनिधीविपुल पाटील )यावर्षी सुरुवातीला म्हणजे हंगामा सुरू होण्यापूर्वी निसर्गाने शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक उचापतीचा खेळ सुरू केला यावर्षी पाऊस बांध राहील असे हवामान खात्याचे वक्तव्य जाहीर करण्यात आले होते. परंतु अगदी त्या उलट स्थिती पाह ण्यास मिळाली हवामान खात्याने जाहीर केलेल्या सूचनेवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी शेती पेरण्या व लागवड केली व हीच बाप शेतकऱ्यांच्या अलगट आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक झटका बसला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने बरेच दिवस उघड की दिल्याने पेरण्या केलेले बियाणे उगवलेच नाही शेतकऱ्यांना दुबारा पेरणीच्या आर्थिक झटका बसला पहिलीच आर्थिक अडचणीच्या सामना करणारा शेतकरी डबल घाई आला. सध्या स्थितीचा विचार केल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात दररोज येणाऱ्या पावसामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे पावसाची सतत थाट रोजच सुरू असल्याने शेतीच्या सर्व खर्च वाढत आहे. पण पिकांची वाढ होताना दिसत नाही सतत जळणाऱ्या पावसामुळे शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून येते पेरणी झालेल्या अशा तऱ्हेचे पाणी साचून राहिल्याने तूर सोयाबीन कापूस या पिकांना धोका निर्माण झाला आहे तूर पिके जायला सारखे झाल्याचे दिसून येत असून कपाशीचे झाडे पिवळी पडत आहे सोयाबीन हे पण चांगल्या स्थितीत दिसत असले तरी त्या झाडांना आलेल्या शेंगा पूर्णपणे भरताना दिसून येत नाही. एकंदरीत शेतीचा विचार केल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीला समोर जात आहे ही शेतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी रिपाइंचे ज्येष्ठ नेते नरेश भाऊ ओंकार यांनी एका पत्रकार द्वारे केली आहे.

ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट*  *हवामान बदल आणि ओला दुष्काळ: शेतकरी विसरलेले पुन्हा संघर्षाच्या पल्याड*  (रिपाई जेष्ठ नेते नरेश भाऊ ओंकार. ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत ची मागणी).
Previous Post Next Post