*गोगलगांव ग्रामपंचायत सदस्यांना कार्यकारी अभियंता घूगे यांची दमदाटी.*. (मानवत / प्रतिनिधी.—)————————परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गोगलगाव ग्राम पंचायतीचे सदस्य यांनी गावात होत असलेल्या निकृष्ट (बोगस) व जलजीवन योजना कामाच्या चोकशीचे पत्र दिल्यामुळे कार्यकारी अभियंता श्री घुगे यांनी तक्रारदाराला दमदाटी केली त्या बाततची तक्रार मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल झाल्याने पून्हा मानवत तालूक्यातील जल जिवन कामाके पितळ उघडे पडले त्यामुळे ऐन सनासुदिच्या दिवसात अभियंत्याच्या कामाचे बींग फूटणार असल्याने प्रशासनात खळबळ उडाली.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यात जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक समाजहिताच्या योजना राबविण्यात येत असून अनेक योजना विषयी नागरिक व सामाजीक कार्यकर्ते तक्रार दाखल करत आहे.त्यामुळे शासन योजनाना घरघर लागली आहे अनेक प्रकल्प अपूर्व आहेत याकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी खूर्चीवर बसून खूर्च्या उबगवत आहे. त्यामुळे अधिकारी नागरिकांना व लोकप्रतिनिधीना धमकावत आहे.बोगस कामामुळे गूत्तेदार व अधिकारी मालामाल होईल पण जनतेला पून्हा पाणि टंचाईचा सामना करावा लागणार असल्याने शासनाच्या कोट्यावधी रूपयाच्या योजना अखेरचा श्वास घेत आहे.मानवत तालूक्यातील गोगलगांव येथील जलजीवन योजने अंतर्गत रूपये एक कोटी चौरेचाळीस लाख रूपयांचे काम करण्यात आले आहे. पण हे काम निकृष्ट व बोगस करण्यात आले आहे. या संदर्भात श्री. रामेश्वर तुकाराम गुरव यांनी दि. 19/09/2025 रोजी कार्यकारी अभियंता घूगे यांच्या चौकशीचे पत्र दिले आहे. या पत्रा संदर्भात श्री. गुरव यांनी कार्यकारी अभियंता श्री घूगे यांना फोन केला व कामा संदर्भात विचारणा केली असता श्री. घुगे म्हणाले ने काही काम झाले आहे ते झाले आहे. कोणत्याही कामाची यापूढे चौकशी होणार नाही. तुला काय करायचे आहे ते कर कोणाकडे तक्रार करायची असेल तर कर असा दम देण्या पर्यंत अधिकार्यांची हिंमत गेली आहे. या संदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या संबंधी तर श्री. घूगे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हे माझे काहीही वाकडे करणार नाहीत. मी कोणाच्या बापाला भीत नाही. असे कर्तव्यदक्ष अधिकारी जर लोकप्रतिनिधीला अशी अरेरावीची भाषा करीत असताल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल. या भ्रष्ट अभियंत्यांना जो माज चढला आहे तो केवळ भ्रष्ट कामे करून कंत्राटदारांकडून मलीदा खाऊन चढला आहे.या निवेदना सोबत दि. 19/09/2025 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत जोडत आहे. मा. साहेबांनी या कामाची सखोल चौकशी करून अशा भ्रष्ट अभियंत्यांना त्याची जागा दाखवून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीरामेश्वर तुकाराम गुरव (ग्रामपंचायत सदस्य) गोगलगांव यांनी केली.***
byMEDIA POLICE TIME
-
0