सेलू मोंढा बाजार समितीत सोयाबीन व भुसार मालाच्या लिलावास प्रारंभ. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या उपस्थितीत लिलाव.सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा येथे आज सोया बीन तसेच इतर भुसार मालाच्या जाहीर लिलावाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.या लिलावप्रसंगी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती डॉ. संजय रोडगे, संचालक, सुरेंद्र तोष्णीवाल, ॲड. दत्ताराव कदम,रामेश्वर राठी, अनिल बर्डे, सचिव दीपक शिंगणे, व्यापारी सुरेंद्र सेठ तोष्णीवाल, द्वारकादास झवर, ओमप्रकाश तोष्णीवाल, संतोष सोमानी,संजय परतानी, सतीश करवा,प्रकाश सोमानी, राजेंद्र प्रसाद मनियार,सुरेश राठी, रामेश्वर सोमानी,सागर करवा, रामेश्वर साबू, यासह अडत्या, शेतकरी बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी सभापती डॉ. संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,“शेतकऱ्यांना त्यांच्यामालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समिती सदैव कटिबद्ध आहे. पारदर्शक व प्रामाणिक लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा समिती चा प्रयत्न राहील.”लिलावाच्या प्रारंभीगिरीश बाबासाहेब काकडे (हातनुर) यांना पहिला मान मिळाला.दरफलकानुसार आजचे भाव पुढीलप्रमाणे होते सोयाबीन : 287 क्विंटल. कमाल ₹4026, किमान ₹3071, सरासरी ₹3799 तूर (लाल) : 20 क्विंटल. कमाल ₹6241, किमान ₹6200, सरासरी ₹6200 तूर (पांढरी) : 07 क्विंटल. कमाल ₹6135, किमान ₹5900, सरासरी ₹6135 गहू :06 क्विंटल. सरासरी ₹2500 लिलाव प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत होणार आहे या आनंदामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी यावेळी सभापती डॉ. संजय रोडगे यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याची संधी उपलब्ध झाली असून, बाजार समितीच्या पारदर्शक व्यवहारपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0