दिव्यांगाचा आत्मसन्मान वाढवणारे मोदीजी सारखे संवेदनशील नेत्रत्व देशाला मिळाले-पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : पूर्वी असलेला अपंग शब्द वगळून त्यांना दिव्यांग संबोधून त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचे व त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम देशातील संवेदनशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे .असे प्रतिपादन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथील कार्यक्रमात बोलतांना स्पष्ट केले .परभणी जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील संघर्ष दिव्यांग समितीच्या वतीने त्यांच्या अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केले होते .येथील साई नाट्यगृहात दि १२ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून राज्याच्या राज्यमंत्री ना.मेघना साकोरे बोर्डीकर या होत्या तर अध्यक्ष पदि संघर्ष दिव्यांग समितीचे अध्यक्ष किशोर साळवे होते .प्रा राजाराम झोडगे यांची यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती .मुख्याधिकारी तुकाराम कदम ,के. बा .शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर ,बाजार समितीचे संचालक रामेश्वर राठी ,गोपाळ काबरा ,दिनकर वाघ ,ऍड अशोकराव फोफसे ,सचिन धापसे ,मनीष कदम ,नरेंद्र दिशागत ,लक्ष्मण बागल ,रमेश दौड ,माणिकराव घुमरे ,अरूण कोल्हे ,बंडू नाना मुळे ,गोविंदराव गायकवाड ,ज्योतीताई मोगल ,संध्याताई चिटणीस ,पंकज निकम आदींची यावेळी व्यास पीठावर प्रमुख उपस्थिती होती .उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .प्रास्ताविकात कॉ .अशोकराव उफाडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला .व दिव्यांगाचा विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दिव्यांग संघटना करीत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली .तसेच दिव्यांग बांधवा साठी एक दिव्यांग भवन उभारण्याची मागणी केली राज्यमंत्री ना मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते केक कापून तसेच शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अशोकराव काकडे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले .यावेळी कै अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई साठी ५१,०००/- हजाराचा धनादेश अशोकराव काकडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला . यावेळी बोलतांना ना. बोर्डीकर पुढे म्हणाल्या की ,समाजातील उपेक्षित घटकांचा मेळावा घेऊन व त्यांना भेट वस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा करण्याचा काकडे यांचा हा उपक्रम निश्चित च अभिनंदनीय आहे .एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात परभणी जिल्हा आघाडीवर असून दिव्यांगांचे सर्व अधिकार व न्याय मिळवून देण्यासाठी देखील आपण निश्चित पुढाकार घेऊ .आश्वासन त्यांनी यावेळी दिले .आतापर्यंत आमच्या दिव्यांग बांधवांच्या पाठीशी कुणीही नव्हते परंतु आता अशोक नाना काकडे हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व आमचे बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत .असे मत यावेळी संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे यांनी सांगितले .यावेळी मनोगत व्यक्त करतांना अत्यंत भावुक झाल्या मुळे त्यांना पुढील मनोगत व्यक्त करता आले नाही.यावेळी सत्काराला उत्तर देतांना अशोकराव काकडे म्हणाले की,दिव्यांगाशी आपली नाळ जोडल्या गेली हे मी माझे भाग्य समजतो कारण गरजूंना मदत करण्यासारखा आनंद कुठेच नाही दिव्यांग हे शरीराने जरी दिव्यांग असले तरी मनाने मजबूत असतात हे आपण जवळून पाहिले आहे .भविष्यात देखील त्यांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी त्यांनी आश्वासीत केले .यावेळी उपस्थित सर्व दिव्यांगना ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले .दिव्यांगांना नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व निधी वेळेत दिला जाईल असे आश्वा सन यावेळी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सांगितले .सर्व जातीचे व धर्माचे मेळावे घेतले जातात परंतु समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांगाचा मेळावा कुठे घेतला जात नाही .व तो अशोकराव काकडे यांनी घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .देशात जवळपास १० कोटी असलेल्या दिव्यांगाचा संघर्ष नियती बरोबर चालू आहे .दिव्यांग असलेल्या व्यक्ती मनाने दिव्यांग नसतात परिस्थितीवर मात करीत त्यांची जगण्याची धडपड चालू असते .परंतु त्यांना गरज असते ती योग्य साथीची व ती साथ व संधी देण्याचे काम अशोकराव काकडे हे करीत आहेत .शासन दिव्यांगासाठी कायदे व उपाय योजना करते परंतु त्याची अमलबजावणी मात्र प्रभावी पणे होत नसल्याची खंत यावेळी प्रा राजाराम झोडगे यांनी यावेळी मनोगतात व्यक्य केली. दिव्यांनाचे बनावट प्रमाणपत्र घेऊन फायदा उचलणाऱ्या व्यक्तीत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे . त्यामुळे खरे लाभार्थ लाभ मिळण्यापासून वंचित राहतअसल्याचे देखील झोडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्य क्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर अशोकराव उफाडे यांनी उवस्थितांचे आभार मानले .शहरातील सर्व संस्था ,संघटना तसेच असोसिएशन च्या वतीने तसेच काकडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी देखील यावेळी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला .

दिव्यांगाचा आत्मसन्मान वाढवणारे मोदीजी सारखे संवेदनशील नेत्रत्व देशाला मिळाले-पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर.                                                                          
Previous Post Next Post