जि प . उर्दु मुलांची शाळा क्र . 3 फैजपूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन.. (यावल तालुका प्रतिनिधी( रविंद्र आढाळे)आज दिनांक 1/10/2025 वार बुधवार रोजी जि.प.उर्दु मुलांची शाळा क्र 3 फैजपुर येथे भारता चे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन शाळेत विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते त्यात चित्रकला, व इंग्रजी विषया चे वाचन व लेखन स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता 3 री व 4 थी चा एक गट व 5 वी ते 7 वी चा एक गट तयार करण्यात आले होते त्या मध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता त्यात दोन्ही गटांमधुन प्रथम , द्वितीय , व तृतीय क्रमांका चे बक्षीस घोषीत करण्यात आले.या बक्षीस समारंभा चे अध्यक्ष म्हणुन सर्वांचे लाडके हसमुख व्यक्तीमत्व यावल पंचायत समिती चे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.विश्वनाथ धनके साहेब ,फैजपुर केंद्रा चे केंद्रप्रमुख गौस खान सर , शाळा व्यावस्थापन समिती चे सदस्य शेख साबिर शेख हसन , शेख अजीमुद्दीन शेख सरदार , शेख मुशीर शेख साबिर यांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली .स्पर्धे चे यशस्वी आयोजन मा.शफीक जनाब उर्दु आघाडी प्रमुख महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , माजी स्विकृत संचालक ग.स.सोसायटी जळगाव तथा मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शना खाली शहजाद पटेल सर, तडवी अजहर सर,सय्यद रोमान सर , जुनैद अहमद सर , आसिफ अली सर ,हारुन सर , तडवी सरफराज सर , काशिफ सर यांनी उत्कृष्ट आयोजन करुन सहकार्य करण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0