अडावद येथे महाजन विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला..... ( चोपडा ( संजीव शिरसाठ ) तालुक्यातील अडावद येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचा परिचय करून देत त्यांचे संरक्षण करण्या बाबत माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. १ रोजी दुपारी दोन वाजता शाळेच्या प्रांगणात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे, वनपाल योगेश साळुंके, वनपाल आर. एस. निकुंभे, वनरक्षक नवल चव्हाण, वनरक्षक गजानन कायईगडे, वनमजूर राजू पाटील, सेवानिवृत्त वनमजूर दशरथ पाटील हे होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी सातपुड्यातील वन्यप्राण्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. अंधश्रद्धांमुळे मांडुळ , वाघ, हरिण या प्राण्यांची शिकार केली जाते. अशांना कायद्याने शिक्षा केली जाते. वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन ढासळते त्यामुळे ढगफुटी सारखे प्रकार होतात त्यातून मानवांसोबत वन्यजीवांना धोका वाढतो. म्हणून वृक्षांचे संवर्धन केल्यानेच अन्नसाखळी निर्माण होऊन वनातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर वाढतील याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच वनपाल योगेश साळुंके यांनी मानवी वस्त्यात वन्यप्राणी आल्यास त्यांना आपले खाद्य देऊ नये तो सुद्धा वनगुन्हा आहे. तसेच वृक्षतोडीमुळे जंगलातील तडस, बिबट असे प्राणी मानवी वस्तीकडे आल्यावर त्यास सहज शिकार उपलब्ध होते म्हणून तो पुन्हा पुन्हा त्या परिसरात येतो. त्याकरिता जंगल वाढवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले. रोप लागवड करताना घ्यावयाची काळजी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्हि.एम.महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पि.आर.माळी, एस. बी. चव्हाण, एस.के . महाजन, पि.एस.पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, अशोक महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार पि.आर. माळी यांनी व्यक्त केले."प्राण्यांवर हल्ला करणे , वृक्षतोड यांबाबत माहिती देण्यासाठी १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले." वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे अडावद

अडावद येथे महाजन विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.....                                                                       
Previous Post Next Post