शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर... (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) शहादा : शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक मंगळवार दि.30 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पुनश्च त्याच कार्यकारिणीची निवड करण्यात आली.बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. राजेंद्र गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चंद्रकांत शिवदे, हर्षल साळुके, प्रा. ए.ए. खान, दिपक वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पत्रकार संघातर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डी. सी. पाटील म्हणाले, शहादा तालुका पत्रकार संघाने आपली भूमिका कायम वेगळी ठेवली आहे. पत्रकारिता करतांना सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी समाज जागृतीचे काम करावे. संघटन हीच खरी शक्ती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नूतन कार्यकारिणी जाहीर- यावेळी सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे:अध्यक्ष: प्रा. नेत्रदीपक कुवर, सचिव: योगेश सावंत, कार्याध्यक्ष: प्रा. डी. सी. पाटील, उपाध्यक्ष: हर्षल साळुंखे, कोषाध्यक्ष: ए.ए. खान, उपक्रम संयोजक: चंद्रकांत शिवदे. कार्यकारिणी सदस्य: सुनिल सोमवंशी, दीपक वाघसल्लागार मंडळ: राजेंद्र अग्रवाल, प्रा. रवींद्र पंड्या, प्रा. दत्ता वाघकायदेशीर सल्लागार: ॲड. राजेश कुलकर्णी नूतन अध्यक्ष प्रा. एन. के. कुवर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश सावंत यांनी केले, तर हर्षल साळुके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर...           
Previous Post Next Post