*गणेश मंडळांनी पटकाविलेले बक्षिस दिले मुख्यमंत्री साह्यता निधी कक्षाकडे सूर्पूद.*{ पंचमुखी गणेश मंडळांनी पटकावले 31 हजाराचे प्रथम पारितोषिक.(मानवत / वार्ताहर.{ अनिल चव्हाण } डॉ अंकुश लाड मित्र मंडळ आयोजित सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर मानवत येथे गणेश उत्सवामध्ये डॉ अंकुश लाड मित्र मंडळाच्या वतीने सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंचमुखी गणेश मंडळांनी *प्रथम* क्रमांक पटकावत सुमारे 31 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर *द्वितीय* पारितोषिक मोरेश्वर गणेश मंडळ आणि *तृतीय* पारितोषिक संत सावता गणेश मंडळाने पटकावले. मानवत शहरातील गणेशोत्सवामध्ये संतोष गडदे यांनी आयोजित केलेल्या या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत शहरातील सर्वच 80 मंडळांनी सहभाग नोंदवला होता. गणेश स्थापनेपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत स्पर्धेसाठी विविध निकष लावण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांसाठी सोमवारी शहरातील रेणुका मंगल कार्यालयात झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ अंकुश लाड, गणेश कुमावत, सुरेश काबरा, ज्ञानेश्वर मोरे मोहन लाड, अनिरुद्ध पांडे,किरण बारहाते, दत्ता चौधरी, विनोद रहाटे, डॉ राजेश्वर दहे, बाजीराव हळनोर,गणेश उगले, राजू खरात, मोहन बारहाते, संतोष गडदे उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पंचमुखी गणेश मंडळ, द्वितीय मोरेश्वर गणेश मंडळ, तृतीय संत सावता गणेश मंडळ तर उत्तेजनार्थ पारितोषिकामध्ये वैभव गणेश मंडळ, पत्रकार संघ गणेश मंडळ, चेतक गणेश मंडळ, ओमकार गणेश मंडळ राजस्थानी गणेश मंडळाला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. परिषद म्हणून अनिरुद्ध पांडे प्रसाद जोशी, किशोर तुपसागर बाबाजी कच्छवे यांनी काम पाहिले प्रस्ताविक अनिरुद्ध पांडे तर सूत्रसंचालन किशोर तूपसागर सत्यशील धबडगे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध गणेश मंडळाचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.बक्षिसाच्या रकमेतून होणार नेत्र शस्त्रक्रिया,पंचमुखी गणेश मंडळाचा निर्णय गणेश उत्सवा मध्ये पंचमुखी गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 36 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे पुढे आले. स्पर्धेतील मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून या 36 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पंचमुखी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला डॉ अंकुश लाड मित्र मंडळाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत उत्तेजनार्थ रोख पाच हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले होते. हे पारितोषिक मिळालेल्या वैभव गणेश मंडळ, पत्रकार गणेश मंडळ राजस्थानी गणेश मंडळ आणि चेतक गणेश मंडळाने मिळालेले पाच हजाराचे पारितोषिक आणि त्यात सहा हजार अधिक चे टाकून प्रत्येकी 11 हजार रुपये राज्यात ओला दुष्काळ पडल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पारितोषिकाची रक्कम देणार असल्याचे जाहीर केले.***

गणेश मंडळांनी पटकाविलेले बक्षिस दिले मुख्यमंत्री साह्यता  निधी कक्षाकडे सूर्पूद.*{ पंचमुखी गणेश मंडळांनी पटकावले 31 हजाराचे प्रथम पारितोषिक.
Previous Post Next Post