**हाफिज अली शेर कुरेशी* यांची एम.आय.एम मानवत शहर व तालुका संघटन प्रभारीपदी नियुक्ती. (प्रतिनिधी / *अनिल चव्हाण.*)——————————ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या मानवत शहर व मानवत तालुक्यातील संघटनात्मक बांधणीसाठी नव्या जबाबदरीची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद गौस (झेन) जिल्हा समन्वयक, एम.आय.एम परभणी यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले या पत्राद्वारे *हाफिज अली शेर मेहबुब पाशा कुरेशी* यांची “संघटन प्रभारी मानवत शहर व तालुका” म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीस महाराष्ट्र ए.आय.एम.आय.एम.चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील तसेच परभणी पर्यवेक्षक हाजी अब्दुल शेख यांनी निवडीस मान्यता दिली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटन शक्ती ग्रामीण तसेच शहरी स्तरावर अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद आहे.पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाफिज अली शेर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मोहम्मद गौस (झेन) यांनी या वेळी केले.***

**हाफिज अली शेर कुरेशी* यांची एम.आय.एम मानवत शहर व तालुका संघटन प्रभारीपदी नियुक्ती.                                  
Previous Post Next Post