धनगर समाजाच्या मागण्यांसाठी देवरी फाटा येथे चक्का जाम आंदोलन; अकोट तालुक्यातील समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. (अकोट प्रतिनिधी, निळकंठ वसू: )जालना येथे धनगर समाजाला एस.टी. आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी दीपकभाऊ बोराळे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत अकोट तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी देवरी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.या आंदोलनात कुटासा गावाचे माजी सरपंच अनंतभाऊ लाखे, रेल गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील अघडते, देवरी येथील विनोदभाऊ नांदुरकर, तसेच काशीरामभाऊ साबळे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. पुरुषोत्तम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य बंदोबस्त करण्यात आला होता.धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य करून न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
byMEDIA POLICE TIME
-
0