जुनी शाळा इमारत लहान मुलांसाठी ठरत आहे धोकादायक; ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेला विल्हेवाट लावण्याची मागणी... (अकोट प्रतिनिधी – अनंत साबळे )तालुक्यातील ग्रामपंचायत तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत सध्या अतिशय धोकादायक स्थितीत असून, लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ती विल्हेवाट लावणे अत्यावश्यक झाले आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेमार्फत या शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण नवीन इमारतीमध्ये सुरू असून, त्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, जुन्या इमारतीचा परिसर पूर्णतः निष्क्रिय असून त्याठिकाणी गवताचे जंगल झाले आहे. त्यामुळे साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर तरोडा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे जुनी इमारत पाडून टाकण्यासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. मात्र अद्याप यावर ठोस निर्णय झाला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे."जुनी इमारत त्वरित पाडण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणताही अपघात टाळता येईल," अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच व गावकऱ्यांनी केली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0