यशवंतराव पतसंस्थेच्या सभासदांना १०% लाभांशासह दिवाळी सप्रेम भेट वाटपाचा शुभारंभ बेल्हे, ता.१६ :- येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्थेने ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना १०% लाभांश व दिवाळी भेट वाटप देण्याचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भांबेरे यांनी सुतोवाच केले होते, त्याचा शुभारंभ मंगळवार (दि. १४) रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात संचालक सभासद व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षात २३ लाख रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १०% टक्के लाभांश आणि दिवाळी सप्रेम भेट देण्याचे संस्थेचे अध्यक्ष भांबेरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केले होते. त्याचा शुभारंभ मंगळवार (दि.१४)रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष भाऊसाहेब भांबेरे, उपाध्यक्ष रामदास गुंजाळ, माजी अध्यक्ष अशोक गुंजाळ, जानकू मटाले, नामदेव औटी, राहुल गुंजाळ, ह.भ.प. बाळशिराम महाराज बांगर, विश्वनाथ डावखर, विद्यमान उपसरपंच राजेंद्र पिंगट, संजय चंगेडिया, बबन गुंजाळ, तानाजी पाबळे यांच्यासह इतरही मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी औटी, कर्मचारी निलेश औटी, आरती सावंत, राणी भांबेरे, महेश घोडके, निखिल गाडगे उपस्थित होते.

यशवंतराव पतसंस्थेच्या सभासदांना १०% लाभांशासह दिवाळी सप्रेम भेट वाटपाचा शुभारंभ                                          
Previous Post Next Post