आपल्या हक्क आणि अधिकारांबद्दल मुलींनी जागृत रहायला हवे - न्यायाधिश दिनेश माने ... (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार: तळोदा दि.१३-महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला म्हणून आजच्या शिक्षित मुलींनी आपल्या हक्क व अधिकारांबद्दल जागृत रहायला हवे अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय देण्यासाठी कायदे बनविले गेले त्याचा वापर केला पाहिजे त्यासाठी तालुका विधी सेवा समिती मुलींच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेल असे प्रतिपादन तळोदा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश दिनेश माने यांनी केले आज तळोदा येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या विद्यमाने विद्यार्थीनींसाठी कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी तळोदा दिवाणी न्यायाधीश दिनेश माने हे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे सचिव ऍड चंद्रकांत आगळे सरकारी वकील ऍड राहुल मगरे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव ऍड अक्षता मुके ऍड दुर्वेश मराठे पत्रकार नितीन गरुड उल्हास मगरे जेष्ठ शिक्षक योगेश पाटील दिलीप तडवी हे उपस्थित होते यावेळी ऍड अक्षता मुके यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व मुलींना येणाऱ्या समस्या मुलींचे कायदेशीर हक्क बालकांविषयक असलेले कायदे त्याचा वापर कसा करावा लैंगिक गुन्हे व अत्याचार विरोधी कायदा याची विस्तृत माहिती दिली ऍड दुर्वेश मराठे यांनी मुलांचे मानसिक आरोग्य त्यावर परिणाम करणारा सोशल मीडिया पिअर प्रेशर व प्रत्येक गोष्टीत स्पर्धेच्या रॅट रेस ने मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे व त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याचे विवेचन केले शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी कन्या विद्यालय प्रतिकूल परिस्थितीतुन आदर्श शाळेकडे करीत असलेल्या वाटचालीचे कौतुक केले मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांनी आपल्या आभाराच्या भाषणात संस्था अध्यक्ष चेतनदादा पवार उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा मगरे, निमेश सूर्यवंशी, महेश मगरे यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना सखी सावित्री समिती, तक्रार पेटी, सीसीटीव्ही इ बाबत सविस्तर माहिती देऊन आभार प्रदर्शन केले. सूत्र संचालन उपशिक्षिका श्रीमती वैशाली देवरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालय लिपिक दीपक चौधरी, उपशिक्षक दिनेश मराठे, भाग्यश्री सागर, हरिश्चंद्र कोळी, ज्योती महाजन, शिपाई अनिल मगरे यांनी परिश्रम घेतले
byMEDIA POLICE TIME
-
0