प्रकल्पग्रस्तांना सोमवारी कारंजा येथे सानुग्रह निधीचे वाटप. (वाशिम जिल्हा विशेष प्रतिनिधी संजय भरदुक: ) जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रहनिधी वाटप केल्या जाणार असून सदरचा कार्यक्रम ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे आयोजीत करण्यात आल्याची माहीती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गुरुजी,युवानेते देवव्रत डहाके, सहसंयोजक भाजपा भक्तराज महाराज यांनी दिली.दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी r आ. श्रीमती सईताई डहाके यांची उपस्थिती राहणार असून यावेळी धर्मगुरु तथा आमदार बाबुसिंग महाराज,खा.संजय देशमुख ,खा. अनुप धोत्रे, आ. श्याम खोडे, आ. भावनाताई गवळी ,आ. अमित झनक, आ. किरणराव सरनाईक, माजी आ. विजयराव जाधव, श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती राहणार असून विशेष अतिथीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, बुलढाणा पाटबंधारे अधिक्षक अभियंता बापुसाहेब गाडे, अधिक्षक अभियंता जिगांव श्रीराम हजारे,कार्यकारी अभियंता ल.पा.संजय जेवळीकर, कार्यकारी अभियंता ल.पा. वाशिम सु.पा. जाधव, कार्यकारी अभियंता ल.पा. हेमंत चव्हाण आदींची उपस्थिती असणार आहे.प्रकल्पग्रस्तांना गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळत नव्हता. यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीने मुुंबई आझाद मैदान तसेच नागपूर, अमरावती वाशिम, आदी ठिकाणी आंदोलने करण्यात आली.आंदोलनाला प्रतिसाद मिळाला विदर्भातील आमदारांनी दखल घेऊन विधानसभा व विधानपरीषदेमध्ये याबाबत आवाज उठविला ऐवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी बैठक घेण्याची जबाबदारी आ. बाबुसिंगजी नाईक तसेच आ. सईताई डहाके यांनी घेतली. त्यामुळे विदर्भातील प्रकल्प ग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान मिळत आहे. अशी माहीती माणिकराव गंगावणे गुरुजी यांनी दिली. कारंजा येथे होत असलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बहुसंख्येने हजर रहावे असे आवाहन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्तांना  सोमवारी कारंजा येथे सानुग्रह निधीचे वाटप.                                                                                      
Previous Post Next Post