सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील __ सभापती डॉ. संजय रोडगे... (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती पत्रकार परिषद बैठकीचे आयोजन; मार्केट कमिटी : शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा, राजकारणाचा नाही”.-डॉ. संजय रोडगेसेलू : दि. 09 डिसेंबर रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतांना सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.ही ठाम भूमिका स्पष्ट केली.पुढे ते बोलतांना म्हणाले की,कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा व्हावा, राजकारणाचा नव्हे, या भूमिकेतून मी सभापती पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत पारदर्शकता, शिस्त आणि विकासाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. माझा स्पष्ट विश्वास आहे की, शेतकरी विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व बदल त्यांनी वेळोवेळी कठोरपणे राबविण्याचे धाडस केले. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता निर्माण करण्यासाठी घेतलेले निर्णय खरोखर कौतुकास्पद आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मार्केट कमिटीतील काही कर्मचाऱ्यांची कामावरील अनास्था, शिस्ताअभावी निर्माण झालेली अव्यवस्था पाहता एक प्रशासकीय उच्च विभूषित सुशिक्षित सभापतीला न पटणारेच होते. म्हणून या सर्व बाबी वर लक्ष केंद्रित केले. आणि त्याची अंमलबजावणी करून सर्वांना एक धक्का दिला. जो काही कर्मचारी यांना पटला नाही. त्यांनी घेतलेले अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कार्यालयामध्ये वेळेवरती हजर राहणे. आल्या बरोबर फिंगर टेक बायोमेट्रिक हजेरी करणे. युनिफॉर्म सक्तीने लागू केले. कंप्युटर प्राविण्य अनिवार्य केले. खोट्या प्रमाण पत्रांवर प्रमोशन घेतलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू केली.रोज केलेल्या कामाचा अहवाल (Daily Report) कार्यालयास कळवणे आवश्यक केले आहे. रोजनिशी लिहिणे बंधनकारक केले. रजेचे नियम कठोरपणे लागू केले. रोजच्या हालचालीचे रजिस्टर सुरू केले. वसुली झालेली रक्कम बँकेत रोज जमा करण्याचे आदेश पारित केले.कोणत्याही कर्मचा ऱ्यांनी पैसे संचालकांकडे किंवा स्वतः जवळ न ठेवता बँकेत जमा करावे. या सर्व नियमांमुळे काही कर्मचारी विरोध करीत असले तरी 90% कर्मचारी पूर्ण सहमतीने शिस्त बद्ध पद्धतीने कामाला लागले आहेत. शिस्त लावणे हे मोठे आणि आव्हाना त्मक काम असले तरी ते दृढ निश्चयाने राबविण्याचे धाडस सभापती डॉ संजय रोडगे यांनी केले आहे.शेतकरी हितासाठी केलेली विकासकामे.शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी त्यांनी सभापती पदावर आल्या बरोबर करण्यात आली.त्यांनीमार्केट यार्डातील जागांची दुरुस्ती करून घेतली. त्याठिकाणी जनावरांचा बाजार सुरु केला. विरोध करणाऱ्यांनी त्या ठिकाणी कधीही भेट न देता केवळ बैठका घेऊन अडथळे निर्माण केल्याचे खंत व्यक्त केली.त्यांनी खरेदी व्यवस्थेत सुधारणा केली.त्यामध्ये CCI चे कापूस खरेदी केंद्र सुरू केले.कापूस खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी शासनाशी सतत पाठपुरावा करत खरेदीची मर्यादा वाढवून घेतली.नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी चालू केले.मागील कार्यकाळात 4 वर्ष बंद असलेला काटा सुरू केला.शेतकऱ्यांच्या शेतमाला साठी मोंढ्यामध्ये बीट सुरू केले.शेतकरी विविध सुविधा उपलब्ध करून देत कमी दरात चाळणी यंत्र सुरू करून शेतकऱ्यांना थेट लाभमिळवून दिला.शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण केले. व्यापारी, हमाल, जिनिंग संचालक यांच्या बैठका घेऊन संवाद वाढवला.राजकारणाला बाजूला ठेवून फक्त शेतकरीहित लक्षात घेऊन काही कठोर आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे काही विरोधक मंडळी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत.शेतकऱ्याच्या जात -पात-पक्ष न पाहता सर्वांचा विकास करण्यासाठी गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदत करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे.“कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाची जागा आहे. येथे राजकारणाला स्थान नाही. शिस्त, पारदर्शकता आणि शेतकरीहित या तीन आधारस्तंभावर आम्ही काम करत आहोत. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. मार्केट कमिटीचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठीच असेल.” अशी ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.या पत्रकार परिषदेसाठी संचालक अँड. दत्तराव कदम,माऊली ताठे, अनिल पवार,शैलेश तोष्णीवाल, रामेश्वर राठी, केशव सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.

सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील __ सभापती डॉ. संजय रोडगे...                                                                            
Previous Post Next Post