कोटेकलूर येथे अखंड शिवनाम सप्ताहाची, भव्य व भक्तिमय सुरुवात. (मारोती एडकेवार जिल्हा: प्रतिनिधी नांदेड) नांदेड :देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकलूर येथे दरवर्षीप्रमाणे, यंदाही अत्यंत श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात अखंड शिवनाम सप्ताहाला सुरुवात झाली. ६ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित सप्ताहाच्या, उद्घाटनासाठी गावातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटे काकड आरती, अभिषेक, रुद्रास्तव पठण व हरिनामाच्या जयघोषात या सप्ताहाचे शुभारंभ झाले.उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर, मंदिर समितीचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी भगवान शिवाच्या चरणी पूजा-अर्चना करून सप्ताहाचे महत्त्व सांगितले. भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.या सप्ताहात दररोज शिवमहिम्न स्तोत्र, रुद्रपाठ, हरिनाम संकीर्तन, शिवपुराण वाचन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला मंडळाच्या संयुक्त विदर्भ गजरामुळे कार्यक्रमाला विशेष भक्तिमय रंग चढणार आहे.ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तिरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी प्रसंगी केले.सप्ताहाच्या काळात कोटेकलूर गावात शांतता, ऐक्य, सामाजिक सलोखा व अध्यात्मिक उर्जा निर्माण झाली असून भाविकांसाठी प्रसाद, पाणी, व्यवस्थापन इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गावातील नागरिकांनी या उत्सवासाठी विशेष तयारी करून मंदिर परिसर सजविला आहे. फुलांच्या तोरणांनी सजवलेला मार्ग, मंदिरे व परिसरातील आकर्षक प्रकाशयोजना यामुळे वातावरण अधिकच पवित्र व मंगलमय झाले आहे.सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विशेष महाआरती, हरिनाम संकीर्तन, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0