जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -1 शाळेत शाळेत माजी विद्यार्थी संघ मेळाव्याचे आयोजन*. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक शाळेत माजी विद्यार्थी संघ मेळावा सन्मा आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी असलेले अनेक डॉक्टर , इंजिनियर,वकील, प्रशासकीय अधिकारी पुणे,मुंबई येथून उपस्थित झाले होते. शाळेतील छोट्या बालचमुंनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत केलं व सुंदर ईशस्तवन व स्वागतगीत सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री सखाराम शेंडकर यांनी प्रास्ताविक करत आजच्या माजी विद्यार्थी संघ मेळाव्याचा उद्देश सांगितला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रितम मुंजाळ यांनी मनोगत व्यक्त करत शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न व शाळेमध्ये उपलब्ध केलेल्या भौतिक सुविधा, राबविलेले विविध उपक्रम, या विषयी माहिती दिली.शाळेचे माजी विद्यार्थी सन्मा.सुनील चोरे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांच्या सहकार्यातून आगामी काळात या शाळेत ए आय लॅब स्थापन करणार असण्याचे सांगितले .श्री सावकर पिंगट,श्री कैलास औटी,श्री राहुल केदारी, श्री.शंकर शिंदे,ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी,श्री सुनील शिंदे ,श्री जयवंत घोडके इ मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आगामी काळामध्ये शाळेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी ग्रामपंचायत बेल्हे च्या सरपंच सन्मा.मनिषा डावखर,सदस्या मंदाकिनी नायकोडी ,विजुकाका घोडके, अण्णासाहेब मटाले, माजी सरपंच विश्वनाथ डावखर, श्री अर्जुन शिंदे, मा.अध्यक्ष गणेश चोरे ,नारायण पवार, दादाभाऊ मुलमुले ,विजय देशपांडे इ. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सन्मान शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैशाली मटाले सदस्या ,स्वाती कोकणे, प्रज्ञा शर्मा, नसरीन पठाण, ईश्वर पिंगट,गोरक्ष शिरतर ,प्रशांत औटी ,विलास पिंगट यांच्या शुभहस्ते करण्यात आला.श्री तुषार डावखर श्री.किशोर अभंग यांजकडून रांगोळी व गड किल्ले तयार करणे स्पर्धेमधील मधील विजयी स्पर्धकांना बक्षिसे मान्यवरांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.आनंद भंडारी साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात 20 लक्ष रुपये संरक्षक भिंतीसाठी मंजूर केल्याचे सांगितले तसेच आगामी काळात शालेय इमारत सर्वांच्या सहकार्यातून उभी करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी सरपंच श्री.महेश बांगर यांनी शाळेसाठी एकावन्न हजार रुपयाची मदत जाहीर केली. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी असणारे सर्व शिक्षक वृंद यांजकडून एक लक्ष रुपये व सन्मा श्री राकेश डोळस यांजकडून शाळेसाठी डिजिटल नाव देण्याचे जाहीर केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वांसाठी स्नेहा भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ मिरा बेलकर सौ प्रवीणा नाईकवाडी, सौ सुषमा गाडेकर सौ.अंजना चौरे ,नूरजहाँ पटेल ,श्री हरीदास घोडे ,श्री रोहिदास साळवे यांनी केले सूत्रसंचालन श्री.संतोष डुकरे यांनी केले तर आभार श्री.अशोक बांगर यांनी मानले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -1 शाळेत शाळेत माजी विद्यार्थी संघ मेळाव्याचे आयोजन*.                                     
Previous Post Next Post