यावलमध्ये इतिहास घडला! महाविकास आघाडीचा दणदणीत विजय भाजपला मोठा धक्का.. (यावल प्रतिनिधी (रविंद्र आढळे)यावल नगरपरिषदेच्या अध्यक्षा पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. छाया अतुल पाटील यांनी १४,१५३ मतांची घवघवीत आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला असून, या निकालाने यावलच्या राजकारणात मोठा उलथापालथीचा क्षण नोंदवला आहे. या विजयासह यावलच्या राजकीय इतिहासात नवे पर्व सुरू झाले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे ८ नगरसेवक निवडून आले असले तरी, नगराध्यक्षा पद भाजपच्या हातातून निसटल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. हा निकाल म्हणजे केवळ निवडणूक विजय नसून, भाजप आमदारांच्या कामगिरीवर यावलकरांनी मतदानातून व्यक्त केलेली स्पष्ट नाराजी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.** नगरसेवक पदांचे निकाल** (पक्षनिहाय)भाजप – ८काँग्रेस – ६राष्ट्रवादी काँग्रेस – ३अपक्ष – ४उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – २बहुमताचे चित्र वेगळे असतानाही, नगराध्यक्षा पदावर महाविकास आघाडीचा विजय हे भाजपसाठी मोठे राजकीय अपयश मानले जात आहे.**पाटील कुटुंबाचा ऐतिहासिक क्षण **उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अतुल वसंतराव पाटील यांनी आपल्या पत्नी सौ. छाया अतुल पाटील यांना नगराध्यक्षा पदावर विजयी करून यावलमध्ये इतिहास घडवला आहे. हा विजय म्हणजे संघटनशक्ती, स्थानिक जनतेचा विश्वास आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीचा ठळक पुरावा असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे.** यावलचा कौल स्पष्टया निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे**यावलकरांनी सत्तेपेक्षा कामगिरीला कौल दिला आहे.महाविकास आघाडीच्या विजयामुळे यावल नगरपरिषदेतील आगामी राजकारण अधिक रंगतदार होणार असून, भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे.यावलमध्ये सत्ता बदलाचा शंखनाद झाला असून, नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे!
byमीडीया पोलीस टाईम
-
0