तळोदा नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाग्यश्री ताई चौधरी विजयी.. (कैलास शेंडे विभागीय संपादक नंदुरबार )तळोदा नगरपरिषदेची नगराध्यक्ष निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. तब्बल १९ दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर आज पूर्णविराम मिळाला असून नगराध्यक्षपदी भाग्यश्री ताई चौधरी यांनी विजय मिळवला आहे.निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय वातावरण तापले होते. विशेषतः योगेश चौधरी यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरली.अखेर झालेल्या मतदान व निकाल प्रक्रियेनंतर भाग्यश्री ताई चौधरी यांनी बाजी मारत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. त्यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाग्यश्री ताई चौधरी यांनी नागरिकांचे आभार मानत, तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.तळोदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्क बसला असून या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा निकाल म्हणजेकाँग्रेस मधून भाजपात आलेल्या आयाराम गयाराम छाप नेत्यांना एकनिष्ठ भाजपच्या मतदारांनी नाकारले व भाजप ला हिसका दाखवला यात ऐकनिष्ठांना डावलून भाजपाचे शहर अध्यक्ष बनलेले व काँग्रेस मध्ये असतांना उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती व नगराध्यक्ष प्रभारी, तसेच सलग दोन पंचवार्षिक निवडून येणारे श्री. गौरव वाणी यांचा भाजपात आल्यावर झालेला पराभव. त्यांच्या विरोधात उभे असलेले तरुण व तडफदार नेते अल्प कारकीर्दीत समाजसेवा करणारे श्री कपिल भाऊ कर्णकार यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे दणदणीत विजय मिळवला.या निकालामुळे तळोदा शहराच्या राजकारणात मोठा बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले या निकालामुळे तळोदा नगरपरिषदेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून आगामी काळात शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0