दि.10 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे माननीय वनमंत्री श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हिंगणघाट विधानसभा मतदार संघ चे आमदार समीर कुन्नावार यांच्या उपस्थितीत व क्षेत्रातील वनव्यवस्थापन, वन्यजीव सुरक्षाविषयक प्रश्न आणि विकासकामांवरील अडथळे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.गेल्या एका वर्षापासून समुद्रपूर तालुक्यातील मौजा गिरड परिसरामध्ये तब्बल ४ वाघ त्यात प्रामुख्याने (१ नर, १ मादी व २ बछडे) मुक्तपणे फिरत आहेत. त्यासंदर्भात चर्चा करून वर्धा व नागपूर वन विभाग तर्फे संयुक्त कारवाई करून १ वाघाला जेरबंद करण्याची परवानगी माननीय वनमंत्री यांनी दिली तसेच उर्वरित ३ वाघांचा देखील जंगल क्षेत्राकडे स्थलांतरित करावे अशी चर्चा करून संबंधित अधिकारी यांना यावेळी सांगण्यात आले.तसेच बैठकीत वन विभाग, वर्धा यांच्या हद्दीतील मौजा कानकाटी तसेच इतर मंजूर तीर्थक्षेत्र विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून शासनाने मंजूर केलेला निधी परत जाणार नाही व स्थानिक भाविकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक असलेली कामे पार पडतील. याशिवाय, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यांतील वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या विविध योजनांमधील मंजूर विकासकामे पूर्ण करण्यासाठी 3/2 च्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी, या विषयावर विशेष भर देण्यात आला. या प्रस्तावांमुळे रस्ते, पायाभूत सुविधा, धार्मिक स्थळे आणि ग्रामविकासासंबंधित अनेक प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.बैठकीस मा. अपर मुख्य सचिव, वन विभाग, मंत्रालय, मुंबई, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म. रा. नागपूर, मा. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), म.रा. नागपूर., मा. वनसंरक्षक, नागपूर .मा. उप वनसंरक्षक, वर्धा. तसेच वन विभागाच्या संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासन उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0