एकरकमी कर भरा ५०% सवलत मिळवा.ग्रामस्थासाठी सुवर्णसंधी ============================================सहदेव तितूर (अकोला जिल्हा विभागीय संपादक) ====दिंनाक - 11/12/2025 ( अकोला)============================(बाळापूर) ----मूख्यमंत्री समॄध्द पंचायतराज अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीदार ग्रामस्थांना एक सुवर्णसंधी उपलब्ध केली व मोहीम राबविण्यात येत आहे ती अशी की १ एप्रिल २०२५ पुर्वीची थकबाकी व चालू मागणी रक्कम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अखेर एक रकमी भरा या थकबाकी वर ५०% कर सवलत मिळवा असे ग्रामपंचायत ने घरोघरी जाऊन भेटी देऊन जनजागृती करत आहे जेणेकरून नागरिकांना त्याच्या फायदा होईल व ग्रामपंचायतीच्या महसुली उत्पन्नात वाढ होवून गावातील सार्वजनिक विकास होईल असे जाहीर आवाहन सरपंच व सदस्यांनी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे तरी अधिक माहितीसाठी आजच आपल्या ग्रामपंचायत ला भेट देऊन अधिकारी सोबत संपर्क साधून ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा.व ग्रामपंचायत ला सहभाग घेऊन सहकार्य करावे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0