दारूच्या नशेत बेदरकार वाहनचालक अटक ; मोटारसायकल जप्त.. वर्धा, दि. 11 डिसेंबर 2025 : वनमाळी मेडिकलसमोर दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांकडून नियमित तपासणी सुरू असताना एक मोटारसायकलस्वार अतिवेगाने व वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याला थांबवून तपासणी सुरू केली असता चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. नाव विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.पोलिसांनी ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर त्याने मोटारसायकल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची मेडिकल तपासणी करण्यात आली असता रक्तात 292 mg अल्कोहोल आढळून आले. आरोपीची ओळख आदित्य रामू मेश्राम (वय 26, रा. मदणी, ता. आर्वी, जि. वर्धा) अशी झाली.या प्रकरणात त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 व 3/181 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याच्याकडील MH 40 J 8007 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाचे एएसआय शब्बीर सय्यद (ब.क्र. 814) व प्रदीप कोहळे (ब.क्र. 983) यांनी संयुक्तपणे करून पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे केली आहे.वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, दारू सेवन करून वाहन चालवू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दारूच्या नशेत बेदरकार वाहनचालक अटक ; मोटारसायकल जप्त..                                                                                             
Previous Post Next Post