दिनांक / / २०२५विषय : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना अंशकालीन (Part-Time) कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत..महोदय,नम्र निवेदन असे की, कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये बेरोजगार युवकांना 11 महिन्यांचे प्रत्यक्ष व नियमित प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीनी शासकीय कार्यालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळविला असून त्यांना प्रशिक्षण पूर्णतेचे अनुभव प्रमाणपत्रही देण्यात आलेले आहे.तथापि, सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण/अनुभव प्रमाणपत्र सध्या कोणत्याही शासकीय आस्थापनेत अनुभव म्हणून गृहीत धरले जात नाही. परिणामी, 11 महिने प्रशिक्षण पूर्ण करूनही मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दुसरीकडे, कौशल्य विभागाच्या अंशकालीन (Part-Time) कर्मचाऱ्यांसाठी शासकीय भरतीमध्ये 10% आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, सदर 10% आरक्षणातील पदांसाठी सध्या पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे ही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.यास अनुसरून नमूद करावेसे वाटते की, 1990 च्या दशकात तत्कालीन शासनाने सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य योजना राबविली होती. त्या योजनेअंतर्गत (Part-Time) तीन वर्षे काम केलेल्या पदवीधर/पदवीधारक युवकांना शासन निर्णय दिनांक 19.03.1998 नुसार खालील सवलती देण्यात आल्या होत्या -1) शासकीय भरतीमध्ये 10% राखीव जागा,2) कमाल वयोमर्यादेत 55 वर्षांपर्यंत शिथिलता.सदर ऐतिहासिक पार्श्वभूमी व समानता लक्षात घेता, शासन निर्णय दिनांक 19.03.1998 मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीनाही तत्सम सवलती देणे न्याय्य ठरेल.आपण विधानसभेत बोलताना तसेच लेखी उत्तरामध्ये येत्या दोन वर्षांत मेगा भरती करण्यात येईल, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सदर मेगा भरती प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट केल्यास, हजारो प्रशिक्षित युवकांना शासकीय सेवेत रोजगाराची संधी प्राप्त होईल.तरी, खालीलप्रमाणे सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, ही नम्र विनंती1) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व अनुभव प्रमाणपत्रधारक प्रशिक्षणार्थीना अंशकालीन (Part-Time) कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्यात यावे.2) शासन निर्णय दिनांक 19.03.1998 मध्ये आवश्यक दुरुस्ती करून सदर प्रशिक्षणार्थीना तत्सम सवलती/प्राधान्य देण्यात यावे.3) प्रस्तावित मेगा भरतीमध्ये या प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.याबाबत सहानुभूतीपूर्वक व तातडीने निर्णय घेण्यात यावा, ही नम्र विनंती.आपला विश्वासू,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी
byमीडीया पोलीस टाईम
-
0