नाकाबंदीत बोलेरो पिकअपसह तीन गोवंश जनावरे जप्त; दोघे आरोपी ताब्यात.. !भद्रावती पोलिसांची कारवाई .... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.20:-भद्रावती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान मानोरा फाटा परिसरात अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी तत्पर आणि प्रभावी कारवाई केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह तीन गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जप्त करण्यात आलेली बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH-34-BZ-9140 अशी असून तिची अंदाजे किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. तसेच वाहनातून तीन गोवंश जनावरे आढळून आली असून त्यांची किंमत अंदाजे ४२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संतोष रामा थोरात (वय ४०, रा. डोंगरगाव, ता. जिवती) आणि शेख दानिश शेख रसुल (वय २४, रा. देव्हाडा, ता. राजुरा)या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे. या प्रसंगी अवैध गोवंश वाहतुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात API विरेंद्र केदारे, लोकेश नायडू, राकेश बंजारीवाले, अंकुश खंडाळे, रोहित चिटगिरे, सतीश कसारे यांनी केली,या यशस्वी कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नाकाबंदीत बोलेरो पिकअपसह तीन गोवंश जनावरे जप्त; दोघे आरोपी ताब्यात..                                         !भद्रावती पोलिसांची कारवाई ....                                                         
Previous Post Next Post