हिंगणघाट हद्दीत रेती चोरीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक; १८.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त.. (हिंगणघाट :स्थानीय गुन्हे शाखा, वर्धा यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती चोरी व वाहतुकीवर मोठी कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण १८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या आदेशानुसार उपविभाग हिंगणघाट परिसरात अवैध व्यवसायाविरुद्ध पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की बोरगाव घाटातून वेणा नदीपात्रातील रेती चोरी करून दोन ट्रॅक्टरद्वारे मांडगाव रोडने हिंगणघाटकडे वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव शिवारात सापळा रचून कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एपी ४६०९) व एक क्रमांक नसलेला ट्रॅक्टर पकडण्यात आला. पंचासमक्ष तपासणी केली असता दोन्ही ट्रॉलीमध्ये ओली काळी रेती (गौण खनिज) आढळून आली. चालकांकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पास नसल्याचे निष्पन्न झाले. सदर रेती शासनाच्या अधिपत्याखालील वेणा नदीपात्रातून चोरी करून आणल्याची कबुली त्यांनी दिली.या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकांविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपींकडून अंदाजे १८,१८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशानुसार पोउपनि. ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा. अमर लाखे, धमेंद्र आकाली, अमरदीप पाटील, पवन पन्नासे व पो.अं. रितेश कुन्हाडकर यांनी केली.

हिंगणघाट हद्दीत रेती चोरीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक; १८.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त..                                                                
Previous Post Next Post