"अखिल भारतीय प्रतिभा खोज स्पर्धेचे आयोजन". (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती- स्थानिक 'साईप्रकाश कला अकादमी भद्रावती' द्वारा व 'सुरो भारती कला केंद्र, कोलकाता' आयोजित" अखिल भारतीय प्रतिभा खोज 2025" या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 व 14 डिसेंबरला स्थानिक हुतात्मा स्मारक, नाग मंदिर समोर येथे करण्यात येत आहे. यामध्ये गाव- शहर पातळीवरील योगा, गायन, नृत्य, वादन, चित्रकला यांमध्ये पारंगत बाल, युवा, प्रौढ कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर कलेचे प्रदर्शन करता येणार असून वय वर्षे चार ते समोर कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना सहभाग दर्शविता येईल. वर्षे चार ते 11 व वर्षे 12 ते खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून सहभागी प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र व पदक मिळणार आहे. केंद्रातून सर्वोच्च गुण प्राप्त स्पर्धकास सुरो भारती कला केंद्राच्या पदवीदान समारंभात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज व अधिक माहिती करिता विनोद ठमके ९९६००५५४००व क्षितिज शिवरकर८००७३६४९४९ यांच्याशी दहा तारखेपर्यंत संपर्क साधावा असे स्पर्धा जिल्हा संयोजकांनी सांगितले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0