श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा तह.राजुरा यांच्या वतीने आयोजित विसावा ब्रम्होत्सव सोहळा*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.6:- श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा आयोजित भव्य विसावा ब्रम्होत्सव सोहळा कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर चे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे तसेच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. राजू डोंगे यांचा सत्कार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चे संचालक तथा माजी आमदार मा. सुदर्शन निमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी देवस्थान समितीचे पदाधिकारी, निशांत देवगडे व मान्यवरासह अनेक भाविक उपस्थित होते.श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा पदाधिकारी व भाविकभक्तांचे मनपूर्वक आभार.
byमीडीया पोलीस टाईम
-
0