चोपडा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा.. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना कॉंग्रेस आघाडीच्या सौ.नम्रता सचिन पाटील यांचा दणदणीत विजय...१५ प्रभागात ३१ नगरसेवकांत शिवसेना १६ तर भाजपाचे ६, कॉंग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, स्वराज्य परिवर्तन चे २ तर अपक्ष १ उमेदवार विजयीडिसेंबर २१, २०२५ चोपडा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा.. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना कॉंग्रेस आघाडीच्या सौ.नम्रता सचिन पाटील यांचा दणदणीत विजय..१५ प्रभागात ३१ नगरसेवकांत शिवसेना १६ तर भाजपाचे ६, कॉंग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, स्वराज्य परिवर्तन चे २ तर अपक्ष १ उमेदवार विजयी चोपडा दि.२२(प्रतिनिधी) चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा निवडणूक निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीच्या धडाकेबाज उमेदवार सौ.नम्रता सचिन पाटील यांचा ५४५३मतांनी आघाडी घेत दणदणीत विजय झाला आहे.या निवडणूकीत चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोडवणे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती काम करून गेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला जोरदार यश मिळले असून नगरपालिकेवर शिवसेना काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. तर नगरसेवक पदासाठी १५ प्रभागात शिवसेना काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या २० जागांवर विजय झाला असून या पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज रिजेक्ट झाल्याने त्यांचाच अपक्ष उमेदवार ईश्वर युवराज अलकारी हे विजयी झाल्याने शिवसेना कॉंग्रेस पक्षाच्या २१नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाच्या ६उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजेच भाजप -राष्ट्रवादी आघाडीचे ८उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच स्वराज्य परिवर्तन आघाडीचे दोन्ही उमेदवारांनी विजयश्री खेचत निकालाचे प्रथम खाते फोडल्याने त्यांच्या विजयाचा जल्लोष सर्वप्रथम पहावयास मिळाला आहे. स्वराज्य परिवर्तन आघाडीचे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र रमेश देशमुख उर्फ राजुभाऊ तर सौ. माधुरी रामचंद्र देशमुख (आबा देशमुख यांच्या पत्नी) या दोघांचे विजयाची माळ गळ्यात पडली आहे .मात्र हे दोन्ही उमेदवार भाजपसोबत असल्याचे जाहीर असून असे १०उमेदवार भाजपा गटाचे विजयी झाल्याचे मानण्यात येत आहे.१५ प्रभाग निहाय अ,ब,क गटानुसार विजयी उमेदवारांची नावे व पक्ष पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक -१अ) हितेंद्र रमेश देशमुख (सुराज्य परिवर्तन आघाडी) ब) माधुरी रामचंद्र देशमुख (सुराज्य परिवर्तन आघाडी) प्रभाग क्रमांक २अ) देवयानी पवन माळी (शिवसेना), ब) शरद बाबुराव पाटील (भारतीय जनता पार्टी) प्रभाग क्रमांक ३ अ) वंदना सुधाकर बाविस्कर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)ब) ईश्वर युवराज अलकारी( अपक्ष)प्रभाग क्रमांक ४अ) रमेश ज्ञानोबा शिंदे (शिवसेना), ब) शिरीन बेगम उस्मान अली (शिवसेना)प्रभाग क्रमांक ५अ) रूकसारवी अब्दुल बागवान सौद (शिवसेना), ब) योगेंद्र राजेंद्र चौधरी ऊर्फ पियूष (शिवसेना )प्रभाग क्रमांक ६अ) दिपाली विनोद चव्हाण (शिवसेना)ब) गजेंद्र अरविंद जयस्वाल (भारतीय जनता पार्टी)प्रभाग क्रमांक ७अ) शकलाबी इसाक बागवान (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)ब) भूपेंद्र नटवरलाल गुजराती (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) प्रभाग क्रमांक ८अ) रोहन महेंद्र पाटील (भारतीय जनता पार्टी)ब) निशा दिलीप जैन (शिवसेना), प्रभाग क्रमांक ९अ) शालिनी रुपचंद पाटील (धनुष्यबाण )ब) नरेंद्र साहेबराव पाटील( भारतीय जनता पार्टी) प्रभाग क्रमांक १० अ) भारती सुनील चौधरी (शिवसेना) ब) अमोल साहेबराव पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)प्रभाग क्रमांक ११ अ)जहागीरदार नसीमबानो जहीरूद्दीन( शिवसेना), ब) हुसेन खान अयुब खान पठाण (शिवसेना)प्रभाग क्रमांक १२अ) प्रवीण सदाशिव देशमुख (शिवसेना) ब) पूजा रणजीत देशमुख (भारतीय जनता पार्टी) प्रभाग क्रमांक १३अ)संध्या नरेश महाजन (भारतीय जनता पार्टी )ब) किशोर रघुनाथ चौधरी (शिवसेना )प्रभाग क्रमांक १४अ) रमाकांत नथू ठाकूर (भारतीय काँग्रेस पार्टी )ब) राजनंदनी राजेंद्र पाटील (शिवसेना) प्रभाग क्रमांक १५अ) वैशाली गोपाळ पवार (शिवसेना )ब) पंकज सुरेश बोरोले (शिवसेना), क) वंदना दिलीप पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रस
byमीडीया पोलीस टाईम
-
0