अखेर नांदगाव नगर परिषदेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा लागलाच, राजेंद्र बनकर यांचा पराभव करून सागर हिरे थेट नगराध्यक्षपदी विजयी ... नाशिकच्या नांदगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालाकडे चातक पक्षावानी नांदगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या निवडणुकीच्या मतदानाचा निकाल दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी रविवारी जाहीर झाला असून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेनेचे सागर हिरे हे. विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश बनकर यांचा पराभव झाला आहे. नांदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज पर्यंतच्या इतिहासामध्ये प्रथमच एका पक्षाचे 19 उमेदवार निवडून आल्याची एकमेव निवडणूक या वेळेला नागरिकांना बघावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार राजेश बनकर यांना मोठा पराभव पत्करावा लागला. नांदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या इतिहासामध्ये विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांचे खाते खोलू शकली नाही त्यामुळे नांदगाव नगरपालिके मध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही. रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नांदगाव नगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक पदाचे (१) बाळासाहेब शेवरे, (२) काका सोळशे, (३) गायत्री शिंदे, (४) कल्पना जगताप, (५) पृथ्वीराज पाटील, (६) सादिक शेख (७) रूपाली पाटील (८) स्नेहल पाटील, (९) वाल्मीक टिळेकर (१०) विद्या कसबे (११) राखी जाधव (१२) राजेश शिंदे इत्यादी उमेदवार निवडून आले असून शिवसेना काशिनाथ देशमुख (अपक्ष) उमेदवार निवडून आले आहे. तर यापूर्वी नांदगाव नगर परिषदेच्या निवडणूक प्रसंगी (१) दीपक प्रमोद पांडव (२) स्वाती अमोल नावंदर (३) योगिता सचिन खरोटे (४) शोभा नेमीचंद कासलीवाल (५) किरण जयप्रकाश देवरे (६) वंदना चंद्रशेखर कवडे (७)जुबेदाबी गफार खान इत्यादी उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाचे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीतील विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेले सागर हिरे यांनी यापूर्वी नगरपालिकेत किंवा कुठल्याही अन्य लाभाचे पद स्वीकारलेले नव्हते. परंतु निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून आमदार सुहास कांदे यांनी सागर हिरे यांना थेट नांदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्याने ते विजयी झाले आणि एक सामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकतो हे एक यातील विशेष बाब म्हणावी लागेल. आमदार सुहास कांदे यांनी सिद्ध करून दिली आहे की निष्ठेने वागाल तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल हे यावरून सिद्ध होत आहे. मीडीया पोलीस टाईम न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल (नाशिक)

अखेर नांदगाव नगर परिषदेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा लागलाच, राजेंद्र बनकर यांचा पराभव करून सागर हिरे थेट नगराध्यक्षपदी विजयी ...                                                 
Previous Post Next Post