कवड घाट–नांदगाव–बोरगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खनन जोमातराजकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य असल्याचा आरोप.तहसीलदार व ठाणेदारांचे दुर्लक्ष, महसूल व पर्यावरणाला मोठा फटका.. (हिंगणघाट विशेष तालुका प्रतिनिधी) कवड घाट, नांदगाव व बोरगाव परिसरातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. नियमांना डावलून दिवसरात्र रेतीचा उपसा होत असून, यासाठी काही राजकीय पदाधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्रास रेती काढली जात आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार व संबंधित ठाणेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांत तीव्र आहे.अवैध रेती उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचा मोठ्या प्रमाणात अपहार होत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

कवड घाट–नांदगाव–बोरगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खनन जोमातराजकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य असल्याचा आरोप.तहसीलदार व ठाणेदारांचे दुर्लक्ष, महसूल व पर्यावरणाला मोठा फटका..                  
Previous Post Next Post