मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.* माननीय श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी 31 डिसेंबरचे पार्श्वभुमीवर होणा-या अवैध दारू निर्मीती व विक्रीवर अंकुश लावण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैधदारू निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असता, सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन. अल्लीपुर हद्दीतील मौजा धोत्रा शेत शिवारात असलेल्या नाल्यालगत रेड केला असता, तेथे आरोपी 1) प्रफुल विक्रम कांबळे, 2) गजानन रामचंद्र कोपरकर, 3) यश गंगाधर वानखेडे, तिन्ही रा. तळेगाव (टा.), जि. वर्धा हे संगणमताने मोठ्या प्रमाणात दारूची हातभट्टी लावुन मोहा दारूची निर्मीती करतांना रंगेहाथ मिळुन आल्याने, जागीचं पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 4,400 ली मोहा सडवा रसायण, 168 ली. गावठी मोहा दारू, 23 ड्रम, गुळ व इतर भट्टी साहित्यासह जु.कि. 5,09,400 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0