*कामगिरीवर मतदारांचा विश्वास; भद्रावतीत शिवसेनेची सत्ता कायम**शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल्ल चटकी नगराध्यक्ष*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.२१ :-भद्रावती नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी यावेळी केवळ राजकीय नाव, पोस्टर-बॅनर किंवा घोषणांपेक्षा उमेदवारांच्या प्रत्यक्ष कामगिरीला महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे. “नाव नव्हे, कामाला मतदारांचा कौल” हा संदेश देत मतदारांनी पुन्हा एकदा भद्रावती नगर परिषदेवर भगवा फडकवला आहे. दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाहीर झाला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांनी भारकाॅंचे उमेदवार सुनील नामोजवार यांचा ८२९ मतांनी पराभव करत विजय मिळवला. प्रफुल्ल चटकी यांना १०,३०४ मते मिळाली, तर सुनील नामोजवार यांना ९,४७५ मते मिळाली. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र.१ अ - उषा जाधव(काॅंग्रेस ६११), ब- महेश जीवतोडे(शिवसेना शिंदे गट ८००), प्रभाग क्रं.२ अ- राखी रामटेके(वंचित ३२०), ब- संदीप वडाळकर (शिवसेना शिंदे गट ३४१), प्रभाग क्रं.३ अ- पल्लवी तामगडे (काॅंग्रेस ४११), ब- सीमा पवार (अपक्ष ३२८), प्रभाग क्रं.४ अ- उर्वेला साव (वंचित ७९४), ब- रंजना गिरडकर (वंचित १२६४), प्रभाग क्रं.५ अ- राहूल सोनटक्के (शिवसेना शिंदे गट ८४३), ब- मंगला नन्नावरे (शिवसेना शिंदे गट ७०५), प्रभाग क्रं.६ अ- मंगेश सोनुलकर (बसपा ४५९), ब- सरिता सूर (काॅंग्रेस ५५८), प्रभाग क्रं.७ अ-वर्षा पढाल (शिवसेना उबाठा गट ६७३), ब- गौरव नागपुरे (शिवसेना उबाठा ७९५), प्रभाग क्रं.८ अ- योगेश गाडगे ( शिवसेना शिंदे गट १३४४), ब- गिरिजा बेहरे (शिवसेना शिंदे गट १२१२), प्रभाग क्रं.९ अ- संतोष कुरेकार (शिवसेना शिंदे गट ७८५), ब- शोभा पारखी (शिवसेना शिंदे गट ७१७), प्रभाग क्रं.१० अ- शिला कुळमेथे (शिवसेना शिंदे गट ७००), ब- सुधीर सातपुते (शिवसेना शिंदे गट ६२९), प्रभाग क्रं.११ अ-देवेंद्र गडपाले (शिवसेना शिंदे गट ६३२), ब- रेखा खुटेमाटे (शिवसेना शिंदे गट ११५६), प्रभाग क्रं.१२ अ- अनिल पडोळे (काॅंग्रेस ७९४), ब- वृषाली पांढरे (भाजपा ७०८), प्रभाग क्रं.१३ अ- जयश्री दुर्योधन (वंचित ५६६), ब- फय्याज शेख (राकाॅं शरद पवार गट ७५९), प्रभाग क्रं.१४ अ- प्रथम गेडाम (काॅंग्रेस २०८०), ब- कल्पना भुसारी(काॅंग्रेस ११७६), क- कविता सावनकर (भाजपा १००३) यांचा समावेश आहे. *केवळ एका मताने विजयी* एकूण १४ प्रभाग असलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या प्रभाग क्रं.१२ ने मात्र भद्रावतीकरांना चांगलीच चपराक दिली.त्यात अ गटातून काॅंग्रेसचे अनिल पडोळे हे केवळ ३ मतांनी निवडून आले.त्यांना ७९४ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश कटलावार यांना ७९१ मते मिळाली. तसेच ब गटातून भाजपाच्या वृषाली पांढरे ह्या केवळ एका मताने विजयी झाल्या. त्यांना ७०८ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काॅंग्रेसच्या कल्पना मत्ते यांना ७०७ मते मिळाली. विशेष म्हणजे भद्रावती नगर परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेचीच सत्ता कायम राहिली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाले आणि न.प.मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांनी योग्य कामगिरी बजावली.तसेच ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0