*मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा* *मनमाड: दिनांक १८डिसेंबर* येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी. एस. देसले होते. प्रमुख वक्ते राज्यशास्त्र विभागाचे प्रा. शरद वाघ यांनी आपल्या मनोगतातून समाजातील अल्पसंख्यांक समुदायांचे हक्क जपणे, त्यांच्यात समानता निर्माण करणे आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा, धर्मस्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा हक्क दिला आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांक हक्क दिन आपल्याला शिकवतो की कोणालाही धर्म, भाषा किंवा संस्कृतीच्या आधारावर कमी लेखू नये. सर्वांनी एकमेकांचा आदर केला तरच देशाची खरी प्रगती होईल. असे प्रतिपादन केले.याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ देविदास सोनवणे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी. व्ही. अहिरे यांनी तर आभार श्री विठ्ठल सातपुते यांनी व्यक्त केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0