*गो,भक्तांच्या* दूर्लक्षामुळे *गौमाता* रस्त्यावर... (मानवत / अनिल चव्हाण.)———————————*मानवत शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक , व धार्मिक नागरिकांचे शहर असून या शहरात नेहमीच सामाजीक, व धार्मिक, व अध्यामिक उपक्रम सूरू असतात शहरात गीता परिवाराचा मोठा वर्ग कार्यरत असून , नाथ संप्रसाद, वारकरी संप्रदाया बरोबर अनेक संप्रदाय शहरात असल्यामुळे शहराला आध्यात्मिक केंद्र म्हणून संबोधल्या जाते त्यामुळे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती प्राप्त आहे.त्यामुळे शहरात गोपालन सारखा उद्योग असल्यामुळे शहरातील अनेक गोशाळेतून दूधाची गंगा वाहत आहे.हजारो लिटर दुध सामान्य जनतेला उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्थेला हात भार मिळत आहे. पण *गोपालक व गो भक्तांचे* मात्र गौमातेकडे दूर्लक्ष होत आहे. शहरातील मूक्त संचार व दारोदारी भटकंती करणार्‍या गोमातेवर उकिरड्यावर पडलेल्या पाॅलिथिन खाण्याची पाळी आली असून शहरातील गो,शाळा व गो, पालकांनी लक्ष देऊन गौमातेच्या रक्षणाची जवाबदारी घेऊन गोमातेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.*

गो,भक्तांच्या* दूर्लक्षामुळे *गौमाता* रस्त्यावर...                          
Previous Post Next Post