कै. दादासाहेब धोटे यांची पुण्यतिथी साजरी.. भंडारा:- कै. दादासाहेब धोटे बहुद्देशीय संस्था भंडारा च्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा माजी आमदार कै. दादासाहेब धोटे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा येथे नुकतेच पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा सह. पत संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सार्वे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अशोकराव ब्राह्मणकर, किशोर अतकरी, कै. दादासाहेब धोटे बहुद्देशीय संस्थेचे सचिव भगिरथ धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सागर सार्वे, सौ. कांचन ठाकरे, प्रदीप दिवे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, जिल्हा सह. पत संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सार्वे, किशोर अतकरी, लक्ष्मण वानखेडे, सुखदेव घरडे, ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख सदानंद ईलमे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कै. दादासाहेब धोटे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मार्ल्यापण अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा माजी आमदार कै. दादासाहेब धोटे यांच्या जीवन चरित्र्यावर मार्मिक मार्गदर्शन केले. दादासाहेब धोटे हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा माजी आमदार असतांना त्यांनी निःस्वार्थ वृत्तीने कार्य केले. नागरिक विकासाविषयी किंवा अत्यंत गंभीर समस्या घेऊन आले की, आहे त्या स्थितीत जनतेच्या कार्यासाठी घराबाहेर पडत होते. त्यांच्या नावाने कुठलाही भूखंड नव्हते. ते किरायाच्या घरात राहत होते. त्यावेळी आमदारांना कुठलीही पेन्शन मिळत नव्हती. आणि अशा वेळेस मुलांचे उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्नही त्यांच्या मनात कधी आलेला नाही. कारण त्यांनी स्वतः ला जनतेच्या कार्याला झोकुन दिले होते. त्यामुळे त्यांनी कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांचे निधन १ डिसेंबर १९६८ ला झाले. त्यावेळी त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शोक सभेत उपस्थित मान्यवरांनी धोटे कुटूंबियांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी १२ हजार रुपये गोळा केले. त्या व्याजातून धोटे कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालत होता. कार्यक्रमाला प्रामुख्याने वसंत धोटे, दत्तात्र्य वानखेडे, विष्णु तराळे, देविदास धोटे, रघुनाथ तुरस्कर, विनायक नागपुरे, गंगाधर तुरस्कर, भारती धोटे, पियुष धोटे, राधा धोटे, किशोर राऊत, राकेश धोटे, संजय ठाकरे, कुमार गावंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0