सावदा पोलीस स्टेशन च्या आशिर्वादाने लोहारा येथील दुरक्षेत्र पोलीस चौकीची दुरावस्था परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता ? तात्काळ पोलीस चौकी दुरुस्त करण्याची परिसरातील जनतेची मागणी. (जळगाव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी फिरोज तडवी ) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा पोलीस चौकीची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन ही पोलीस चौकी सध्या स्थितीत जीवितहानी होण्यास कारणीभूत ठरत आहे ही पोलीस चौकी अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे आणि सध्या स्थितीत जीर्ण झाली असल्याने या पोलीस चौकी परिसरात लहान मुले.महिला नागरिक ये.जा करीत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील ह्या पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच ह्या पोलिस चौकीचे छप्पर हे जुन्या काळातील कौलारू छप्परचे असल्याने ह्या पोलीस चौकीच्या भिंतीसह कौलारू छप्पर केव्हाही कोसळु शकते.आणि या ठिकाणी खुप मोठी जीवीतहानी होऊ शकते व जिवीतहानी होण्याची दाट संभावना भासत आहे.त्याचबरोबर ह्या पोलीस चौकी मध्ये आतील खोल्यांमध्येही घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. यामुळे देखील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर ह्या पोलीस चौकीच्या भिंती देखील तुटुन पडलेल्या अवस्थेत आहेत.आणि पोलीस चौकीच्या आतमध्ये खाली देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत यावरुन असे समजते की परिसरात अवैध धंदे देखील बोकाळले असल्याचे चित्र आहे.हा सगळा प्रकार सावदा पोलिस स्टेशन च्या अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती असल्यावरही जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी अशी सावदा पोलिसांची परिस्थिती असल्याने परिसरातील जनतेला लोहारा येथील पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे..तरी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब यांनी या लोहारा दुरक्षेत्र पोलीस चौकी कडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पोलिस चौकीची सुधारणा करावी आणि परिसरातील जनतेला जीवीतहानी होण्यापासून वाचवावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0